आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांनी आजही विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांविरोधात घोषणाबाजी केली. शिंदे गटातील सत्ताधाऱ्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर व्यक्तिगत टोलेबाजी केली. 'युवराजांची कायमच दिशा चुकली', असं पोस्टर दाखवत आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये त्यांनी दिशा या शब्दाला बोल्ड केल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.